Home / क्रीडा / युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांचे खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन – पराग संधान

युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांचे खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन – पराग संधान

” खेळाडूंना तलवारबाजीचे साहित्य भेट “

युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांचे खेळाडूंना सातत्याने प्रोत्साहन – पराग संधान

” खेळाडूंना तलवारबाजीचे साहित्य भेट “

कोपरगांव

कोपरगांव येथे खेळाडूंना अधिक प्रोत्साहन मिळावे, आधुनिक सुविधा उपलब्ध व्हाव्यात या दृष्टीने युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. त्यांनी अहमदनगर जिल्हा फेन्सिंग असोसिएशनचे समर्थ स्पोर्ट्स अकॅडमी यांना तलवारबाजीचे इलेक्ट्रॉनिक स्कोअर बोर्ड तसेच विविध खेळांसाठी आवश्यक साहित्य भेट स्वरूपात दिले. या साहित्याचे उद्घाटन अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, ॲड.जयंत जोशी यांच्या शुभहस्ते संपन्न झाले. या प्रसंगी अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली.

पराग संधान बोलताना म्हणाले की खेळाला राजाश्रय मिळाला, तर ग्रामीण भागातील सुप्त प्रतिभेला योग्य दिशा व व्यासपीठ मिळू शकते.यावर भर देत विवेकभैय्या कोल्हे हे सातत्याने विविध माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन देत आले आहेत. आर्थिक सहाय्य, आवश्यक साहित्य, मार्गदर्शन, तसेच विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन या माध्यमातून ते युवा पिढीला सकारात्मक ऊर्जा देत आहेत. कोपरगांव मतदारसंघातील खेळाडूंनी केवळ जिल्हा नव्हे तर राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवावे, ही त्यांची दूरदृष्टीपूर्ण भूमिका आहे.

उद्घाटनप्रसंगी ज्येष्ठ क्रीडा प्रशिक्षक दिलीप घोडके सर, वानखेडे सर,चंद्रशेखर शेजुळ सर,राजू शेंडगे सर,रियाज सर, कोताडे सर, योगगुरू अभिजित शहा,शिवप्रसाद घोडके सर तसेच प्रशिक्षक व सर्व खेळाडू उपस्थित होते. या कार्यक्रमात खेळाडूंनी दिलेल्या साहित्याबद्दल समाधान व्यक्त केले आणि अशा आधुनिक सुविधांमुळे सरावाला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.

या उपक्रमामुळे कोपरगांवमधील क्रीडा संस्कृतीला बळकटी मिळेल, असे प्रतिपादन उपस्थित मान्यवरांनी केले. युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांच्या या प्रयत्नामुळे खेळाडूंमध्ये नवी उमेद निर्माण झाली असून, हे योगदान निश्चितच प्रेरणादायी ठरणार आहे. त्यांच्या अशा सकारात्मक सहभागामुळे कोपरगांव तालुक्याचा क्रीडा नकाशावर ठसा उमटवण्याचा मार्ग सुकर झाला आहे अशा भावना पराग संधान यांनी यावेळी बोलताना व्यक्त केल्या.

Tagged:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *